अपक्ष उमेदवार रेश्मा खतीब यांचा प्रभाग ९ चा विकास व सक्षमीकरणाचा ध्यास.!
माजी नगराध्यक्ष शरफोद्दीन खतीब यांची नात निवडणूक रिंगणात.!
अपक्ष उमेदवार रेश्मा खतीब यांचा प्रभाग ९ चा विकास व सक्षमीकरणाचा ध्यास.!
सांगोला / तालुका प्रतिनिधी
सांगोला तालुका तसेच विशेषतः सांगोला शहरातील समाजकारणात नेहमीच अग्रस्थानी असणारे कुटुंब म्हणून खतीब कुटुंबीयांना ओळखले जाते या कुटुंबातील बहुतांश सदस्यांचे आज तागायत करत आलेले सेवाभावी पणे व्यवसाय असो अथवा समाजकारण यामध्ये मोलाचे योगदान असते त्यात एकेकाळी सांगोला शहराच्या विकासामध्ये महत्त्वाचा वाटा असलेले माजी नगराध्यक्ष शरफोद्दीन खतीब यांचे नाव समाजकारण आणि राजकारण करणाऱ्या दिग्गज नेत्यांमध्ये अतिशय सन्मानाने घेतले जाते त्यांच्या कार्यकाळात सांगोला शहरातील तत्कालीन नागरिक समस्या असो अथवा सामाजिक बांधिलकीसाठी त्यांनी भरीव असे योगदान दिले आहे.
एकेकाळीच्या अशा लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेल्या माजी नगराध्यक्ष शरफोद्दीन खतीब यांची नात अर्थात रेशमा निसार खतीब या प्रभाग क्रमांक ( ९ ब) येथून सांगोला नगरपालिकेची निवडणूक लढत आहेत त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला शहर व तालुक्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्या अहोरात्र झटत आहेत सांगोला तालुक्यातील निर्भीड पत्रकार मिनाज खतीब यांच्या त्या भगिनी आहेत.
त्यांनी अनेक महिलांना त्यांच्या कौटुंबिक समस्या असो की शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या कामकाजाबाबत नेहमीच सहकार्याची भूमिका घेतलेली सर्वांना परिचित आहेच तर गोरगरीब कुटुंबातील सदस्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार बाबत नेहमीच उठाव करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम रेश्मा खतीब यांनी केले आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी ही प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवून देणे तसेच महिला सक्षमीकरण या मुद्यांसाठी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.!
चौकट:-
रेश्मा खतीब या अहोरात्र समाजकार्यासाठी कटिबद्ध.!
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून समाजकार्य करण्यासाठी पुढे आलेल्या लोकांची संख्या वाढत असून गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब जनतेला त्यांचे न्याय व हक्क मिळवून देत महिला सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तथा प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार रेश्मा खतीब यांनी जीवात जीवमान असे तो पर्यंत समाजकार्यासाठी कटिबद्ध राहीन अशी ग्वाही यावेळी दिली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा