नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वेश झपके यांच्या होम टू होम प्रचारात महिलांनी घेतली विशेष आघाडी.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वेश झपके यांच्या होम टू होम प्रचारात महिलांनी घेतली विशेष आघाडी.
सांगोला (प्रतिनिधी)
सांगोला नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांच्या प्रचारार्थ पाटील वस्ती,सुतार वस्ती,
सुरवसे वस्ती, केदार वस्ती, खाडे वस्ती,बेले मळा प्रभाग क्रमांक ११ मध्ये शीलाकाकी झपके,प्रार्थना बिज्जरगी / झपके व महिलांनी प्रचारासाठी विशेष आघाडी घेतली आहे.
घरोघरी प्रत्यक्ष मतदारांना भेटून सांगोल्याच्या शाश्वत विकासासाठी होणाऱ्या विकास कामासंदर्भात, स्वच्छ व पारदर्शक कार्यपद्धतीबद्दल, भविष्यातील विविध योजनेबद्दल, तसेच सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात येत आहे.
या प्रचाराफेरीमध्ये नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांचे आधुनिक विचार, शहर विकासासाठीची नवनिर्मिती, स्वच्छ व पारदर्शक कार्यपद्धती प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचलेली दिसत आहे.त्यामुळे सांगोला शहरात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार विश्वेश झपके बाजी मारणार..
*चौकट* शांत व संयमी व्यक्तिमत्व असणारे विश्वेश झपके हे निश्चितपणे नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये सांगोला शहराचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास प्रत्यक्ष भेटीदरम्यान अनेकांनी व्यक्त केला. सांगोला शहरासाठी विविध प्रकारच्या नवनवीन संकल्पना व त्यातून शहराचे आधुनिकीकरण हा अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांचा विचार हळूहळू सांगोला शहराबरोबर वाडी वस्त्यांपर्यंत पोहोचत आहे. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्या घटकाला समजून घेऊन न्याय देण्याची भूमिका ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत आहे. येणाऱ्या निवडणुकीत चार वेगवेगळे पक्ष विविध पद्धतीने लढत असताना अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे विश्वेश झपके ( अनुक्रमांक - ४ चिन्ह - एअर कंडीशनर) यांच्याकडे सर्वसामान्य मतदारांचे विशेष लक्ष आहे ही बाब आता उघड होत आहे.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा