सांगोला, ता. ६ : महूद येथील जितेंद्र बाजारे यांची शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटनेच्या माढा लोकसभा प्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगोला, ता. ६ : महूद येथील जितेंद्र बाजारे यांची शिवसेना प्रणित शिव उद्योग संघटनेच्या माढा लोकसभा प्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उद्योगमंत्री उदय सामंत,खासदार श्रीकांत शिंदे,माजी आमदार ॲड्.शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिव उद्योग संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष दिपक काळीद,सरचिटणीस प्रकाश ओहळे यांनी जितेंद्र बाजारे यांना या निवडीचे पत्र दिले आहे. नोकरी इच्छुक तरुणांना नोकरी मिळवून देणे.तसेच महिला व पुरुषांना व्यवसाय सुरू करून देण्यासाठी जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांची शिव उद्योग संघटनेच्या माढा लोकसभा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.
जितेंद्र बाजारे यांची शिव उद्योग संघटनेच्या माढा लोकसभा प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल मंगेश चिवटे,शिवसेना सांगोला तालुका प्रमुख दादासाहेब लवटे,सोलापूर जिल्हा सोशल मिडीया प्रमुख अमित पाटील,शिव उद्योग संघटना जिल्हा प्रमुख श्रीनिवास करे,दिग्विजय पाटील,
सागर पाटील,अभिजित नलवडे यांचेसह सांगोला तालुक्यातील शिवसेना नेते व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
जितेंद्र बाजारे हे सुतगीरणीचे संचालक महेंद्र बाजारे यांचे जेष्ठ बंधू आहेत.
बाजारे कुटूंबीय राजकारण,समाजकारण,उद्योग,शेती,शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत.जितेंद्र बाजारे हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य,सोलापूर जिल्हा सराफ असोसिएशनचे सदस्य म्हणून काम पाहत आहेत. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दिपक काळीद यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग उभारणी,बचतगटांना शासन सहाय्य,नोकरी मार्गदर्शन,रोजगार मेळावे घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे जितेंद्र बाजारे यांनी सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा