सांगोला तालुक्याचे तहसीलदार संतोष कणसे यांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती

सांगोला तालुक्याचे तहसीलदार संतोष कणसे यांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती.

गावाकडच्या बातम्या संपादक कैलास हिप्परकर मो 98 81 47 27 91

सांगोला तालुक्यातील जनतेचा लाडका अधिकारी आता जिल्हास्तरीय जबाबदारीवर


 सांगोला/प्रतिनिधी;>सांगोल्याच्या जनतेच्या मनात घर करणारे, जनहितासाठी सदैव तत्पर राहिलेले कर्तव्यदक्ष तहसीलदार संतोष कणसे यांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाली असून सांगोला तालुक्यात त्यांच्या पदोन्नतीची बातमी समजताच सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. महसूल विभागाकडून २०२५-२६ या वर्षासाठी तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्याच्या अनुषंगाने ही निवड करण्यात आली असून राज्यातील ११२ अधिकाऱ्यांमध्ये सांगोल्याचे तहसीलदार कणसे साहेब यांचाही समावेश आहे.


संतोष कणसे यांनी गेल्या दोन वर्षांत सांगोला तालुक्यात अत्यंत प्रामाणिकपणे, सचोटीने आणि जनभावनांना अनुसरून कामकाज केले आहे. कोणतीही समस्या असो, रस्त्यांच्या तक्रारींपासून ते नागरिकांच्या कामांपर्यंत त्यांनी 'सामंजस्याने शासकीय आणि पारदर्शकतेने उपाय शोधणे' हा दृष्टिकोन कायम ठेवला.


विधानसभा निवडणूक असो वा सध्या सुरू असलेली नगरपालिका निवडणूक, प्रत्येक वेळी त्यांनी अचूक नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि तणावमुक्त अंमलबजावणी यामुळे प्रशासनाचे तसेच जनतेचे मन जिंकले. त्यांच्या नेतृत्वाखाली सांगोल्यातील निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि अनुकरणीय ठरली होती.


कणसे यांच्या या पदोन्नतीमुळे सांगोला तालुक्याच्या जनतेमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि लोकाभिमुख प्रशासनाची सांगोला तहसील कार्यालयातील ओळख निर्माण करणाऱ्या संतोष कणसे यांची उपजिल्हाधिकारी पदावर झालेली बढती ही सांगोल्यासाठी गौरवाची बाब ठरली आहे.


जनतेसाठी काम करणे हीच खरी सेवा हे ब्रीद घेऊन काम करणारे संतोष कणसे आता जिल्हास्तरीय जबाबदारी सांभाळणार आहेत. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी सांगोल्याच्या जनतेकडून हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण