जनमताचा कौल मान्य, आत्मपरीक्षण करून पुन्हा कामाला लागू .
जनमताचा कौल मान्य, आत्मपरीक्षण करून पुन्हा कामाला लागू .
दि,२१ डिसेंबर;> सांगोला नगरपरिषदचे नूतन नगराध्यक्ष आनंदा माने आणि सर्व विजयी नगरसेवकांचे प्रथम मनपूर्वक अभिनंदन या निवडणुकीत आमच्या शहर विकास आघाडीचा पराभव झाला. सांगोला शहरातील नागरिकांना शहरविकास आघाडीच्या नेते मंडळींनी घेतलेले निर्णय रुचले नाहीत किंवा आमची भूमिका पटली नाही त्यामुळेच आमच्या आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले हेच आजच्या निकालावरून समोर आले.आमच्या आघाडीचा हा पराभव धक्कादायक असला तरी या पराभवाने आम्ही कुणीही खचून जाणारे नाही या पराभवाची कारणमीमांसा करू आम्ही कुठे कमी पडलो याचे आम्ही आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करू आणि आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकात पुन्हा नव्या जोमाने झालेल्या चुका टाळून पुन्हा एकदा जनतेच्या न्यायालयात आमची विकासाची भूमिका घेऊन खंबीरपणाने मैदानात उतरू आणि जनमताचा आदर करून योग्य सर्व निर्णय घेऊ आणि आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करू ;
मा.आम.दिपकआबा साळुंखे पाटील

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा