प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली हजारो पशुपालक मंत्रालयावर फेकणार दुधाची मोकळी केंड.

 

प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली हजारो पशुपालक मंत्रालयावर फेकणार दुधाची मोकळी केंड.



निवडणूकीच्या तोंडावर पशुपालक व शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता.


मंगळवार दि.30/12/2025 रोजी इशाऱ्यासाठी सांगोला तहसिल कार्यालयासमोर पशुपालक फेकणार दुधाची केंड.

                

               राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये प्रति लिटर 5 रु. आणि ऑक्टोंबर - नोव्हेंबर मध्ये प्रति लिटर 7 रु. अनुदान शासनाने जाहीर केले होते. तथापि शासनाने केवळ पहिल्या टप्प्यातील अनुदान दिले असून दुसऱ्या टप्प्यातील अनुदानच दिलेले नाही‌. त्याचबरोबर चारा छावण्यांची प्रलंबित बिलेही अद्याप दिलेली नाहीत. त्यामुळे पशुपालकांचे आणि शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. आणि त्यांच्यावर फार मोठा अन्याय होत आहे. या पार्श्वभूमीवर किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांच्या नेतृत्वाखाली हजारो पशुपालक तारीख न सांगता थेट मंत्रालयासमोर व आयुक्तालयासमोर दुधाची मोकळी केंड फेकणार आहेत. याबाबत इशारा देण्यासाठी मंगळवार दि.30/12/2025 रोजी असंख्य पशुपालक सांगोला तहसिल कार्यालयासमोर दूधाची मोकळी केंड फेकणार आहेत. यामुळे निवडणूकीच्या तोंडावर दुधाचे थकीत अनुदान आणि चारा छावण्यांची प्रलंबित बीले यासाठी पशुपालक व शेतकऱ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.


               मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा संबंधित वरिष्ठ जबाबदार अधिकारी यांनी तत्काळ लेखी आश्वासन देण्याची मागणी प्रफुल्ल कदम यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण