‘हिंदकेसरी’ प्रियाने सांगोला तालुक्याचा मान उंचावला – दीपकआबा साळुंखे पाटील
‘हिंदकेसरी’ प्रियाने सांगोला तालुक्याचा मान उंचावला – दीपकआबा साळुंखे पाटील.
हणमंत सुरवसे यांच्या ‘प्रिया’ने पुसेगाव येथे पटकावला ‘हिंदकेसरी’ किताब
सांगोला (प्रतिनिधी): देशी खिलार वंशाची परंपरा, कष्टाची साथ आणि जिद्दीची झळाळी… या त्रिसूत्रीचा संगम साधत सांगोला येथील हणमंत सुरवसे यांच्या ‘प्रिया’ या खिलार गायीने पुसेगाव येथील भव्य खिलार जनावरांच्या प्रदर्शनात सर्वोच्च ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून सांगोल्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे. खिलार जनावरांच्या प्रदर्शनात ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून राज्यभर सांगोल्याचा लौकिक वाढवणाऱ्या ‘प्रिया’ या खिलार गायीच्या यशाची दखल घेत माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सुरवसे कुटुंबाच्या घरी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी हणमंत सुरवसे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि ‘प्रिया’ने मिळवलेल्या हिंदकेसरी किताबाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. जनावरांची निगा, आहार, प्रशिक्षण, वंशपरंपरा तसेच प्रदर्शनासाठी केलेल्या तयारीबाबत त्यांनी आपुलकीने चर्चा केली.
जातिवंत खिलार जनावरांचे संगोपन करणारा तालुका म्हणून सांगोला तालुक्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हणमंत सुरवसे व त्यांच्या कुटुंबियांनी पोटच्या मुलाप्रमाणे खिलार जनावरांचे संगोपन केले आहे. श्री तीर्थक्षेत्र सेवागिरी महाराज पुसेगाव ता.खटाव येथील यात्रेत ७८ वे हिंदकेसरी प्रदर्शन संपन्न झाले. पुसेगाव येथील खिलार जनावरांच्या प्रदर्शनात ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून राज्यभर सांगोल्याचा लौकिक वाढवणाऱ्या ‘प्रिया’ या खिलार गायीच्या यशाची दखल घेत माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांनी सुरवसे कुटुंबाच्या घरी सदिच्छा भेट दिली.या भेटीदरम्यान त्यांनी हणमंत सुरवसे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि ‘प्रिया’ने मिळवलेल्या हिंदकेसरी किताबाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.
जनावरांची निगा, आहार, प्रशिक्षण, वंशपरंपरा तसेच प्रदर्शनासाठी केलेल्या तयारीबाबत त्यांनी आपुलकीने चर्चा केली. यावेळी दीपकआबा साळुंखे पाटील म्हणाले की, “देशी खिलार वंशाचे जतन व संवर्धन हे काळाची गरज असून सुरवसे कुटुंबाने मिळवलेले हे यश इतर पशुपालकांसाठी प्रेरणादायी आहे.” अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असेही त्यांनी नमूद केले. या यशामागे हणमंत सुरवसे यांची अहोरात्र मेहनत, जनावरांप्रती असलेली आपुलकी आणि परंपरागत ज्ञानासोबत आधुनिक निगा-पद्धतींचा समतोल कारणीभूत ठरला. संतुलित आहार, नियमित व्यायाम, स्वच्छता व योग्य आरोग्य तपासणी यामुळे ‘प्रिया’ आज राज्यातील खिलार वंशाचा मानबिंदू ठरली आहे असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
सांगोलकरांच्या लाडक्या ‘प्रियाने’ मिळवलेला ‘हिंदकेसरी’ किताब हा केवळ एका गायीचा विजय नसून, देशी खिलार वंशसंवर्धनाच्या चळवळीचा विजय असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. या यशाबद्दल हणमंत सुरवसे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, देशी खिलार वंशसंवर्धनाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यावेळी हणमंत चव्हाण, शरद मोरे कडलास, सिताराम सुरवसे, अरुण सुरवसे (चेअरमन), अजय सुरवसे, अंकुश केदार, लहू सुरवसे, विजय केदार, पोपट सुरवसे, अजित अनुसे, सुरज वाघमोडे, विजय गव्हाणे यांच्यासह पशुपालक शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा