सांगोला नगरपरिषदेच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सदस्य यांचा स्वागत समारंभ संपन्न.

 सांगोला नगरपरिषदेच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सदस्य यांचा स्वागत समारंभ संपन्न. 

गावाकडच्या बातम्या संपादक कैलास हिप्परकर मो 98 81 47 27 91


दि, 29 डिसेंबर;>सांगोला नगरपरिषदेच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. आनंदा माने व नवनिर्वाचित सदस्य यांचा स्वागत समारंभ मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सर्व सदस्यांचा शाल व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले तसेच सर्व विभागप्रमुख यांनी आपल्या विभागाची माहिती दिली. सांगोला शहराला विकासाची नवी उंची गाठण्यासाठी प्रशासन व सदस्यांनी एकत्र काम करावे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांची कामे जलद गतीने निकाली काढावीत अशा सूचना लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री.आनंदा माने यांनी केल्या. नगरसेविका सौ. राणी माने, नगरसेवक श्री. रमेश जाधव व नगरसेवक श्री. ज्ञानेश्वर तेली यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरपरिषदेचे सर्व अधिकारी

कर्मचारी, शहरातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण