आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सर्व धर्मियांचा विश्वास संपादन केला--भाई चंद्रकांत सरतापे.

 आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सर्व धर्मियांचा विश्वास संपादन केला--भाई चंद्रकांत सरतापे.



दि,१९ डिसेंबर;> आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी धनगर ,मराठा व इतर काही समाजाच्या  आरक्षणाबाबत  विधानसभेत वारंवार प्रश्न उपस्थित केलेला आहे..गेले अनेक वर्षे धनगर समाजाचा  आरक्षणाच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे ठेवण्यात आले आहे.तरी धनगर समाजाला आरक्षण मिळावे अशी आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनात नागपुर येथे विधानभवनात मागणी केली..त्याच प्रकारची मराठा आरक्षणाची सुध्दा मागणी या अगोदर आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी केलेली आहे..

आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी आरक्षणाची मागणी केली याचा आर्थ ईतर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला त्यानी विरोध केलेला आहे असे नाही...संविधानाने जे अधीकार दिले आहेत त्या आधारावर आरक्षणाच्या व  इतरही काही मागण्यासाठी सभागृहात आवाज उठवण्याचा आधिकार आमदारांना आहे त्यानुसार आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी विविध आरक्षणाबाबत सभागृहात  आवाज उठवलेला आहे... त्यामध्ये सर्व समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा त्यांनी लावून धरला आहे..शेवटी 

  राज्य सरकारने कोणत्या समाजाला कशा प्रकारे आरक्षण द्यायचे व ते कायद्याच्या चौकटीत कसे बसवायचे ते काम सरकारचे आहे.कोणताही आमदार असो खासदार किंवा इतरही कोणी ईतरांचे आरक्षण काढुन दुसऱ्यांना द्यावे असे म्हणत नाही..व तसे म्हणने योग्य ही नाही..शेवटी आरक्षण हे कायदेशीर रित्या मिळाले तर ते टिकेल यांचा विचार करावा लागतो..एखाद्या समाजासाठी आरक्षण मागीतले तर ते दुसऱ्या समाजाने नाराज होता कामा नये... शेवटी सरकारने आरक्षण कसे द्यायचे हा त्यांचा म्हणजे सरकारचा सर्वस्वी अधिकार असतो..मागणी करणे आपले काम आहे  त्याला न्याय देणे सरकारचे काम आहे.

  काही लोक आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विशिष्ठ समाजाच्या आरक्षणाचा  प्रश्न उपस्थित केला म्हणून आमच्यावर अंन्याय झाला... आसा जो तर्क तयार करुन संभ्रम निर्माण करीत आहेत ते साफ चुकीचे आहे.मराठा आरक्षण,धनगर आरक्षण किंवा इतर आरक्षण या बाबत आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख हे कायम सकारात्मक आहेत.उगीचच काही लोक संभ्रम निर्माण करीत आहेत.मराठा आरक्षणाचे  आंदोलन सुरु असताना त्या मागणीसाठी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी पाठिंबा दिला, तेंव्हा सुध्दा काही लोक चुकीच्या बातम्या पसरवून संभ्रम निर्माण करीत होते तसाच प्रकार आज होताना दिसत आहे‌‌.परंतु आमदार बाबासाहेब देशमुख यांची नियत साफ आहे डोक्यात शेवटच्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे या उद्देशाने ते अविरत काम करीत आहेत.आणी राहीला विषय मतांचा एकदा का लोकप्रतिनिधी निवडून आला की..ज्यांनी मत दिले व ज्यांनी मत दिले नाही असा भेद भाव‌ न‌ करणे ही परंपरा स्व.आबासाहेबांनी घालून दिली आहे.त्या परंपरेनुसार आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख सुध्दा काम करीत आहेत.

  आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी गेले वर्ष भरात विधानसभेमध्ये जी कामगीरी केली आहे.त्याचे कौतुक संपूर्ण राज्यात होत आहे.विधानभवनात आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख प्रश्न उपस्थित करताना व ते मांडताना टि.व्ही किंवा सर्व समाज माध्यामावर  पाहील्यावर त्यांच्या  अभ्यासु वृत्तीचे व सर्वसमावेशक प्रश्नांना वाचा फोडण्याची असलेली  तळमळ पाहुन अनेक जण समाधानाने " बाबासाहेब तर प्रति आबासाहेब " म्हणून चर्चा करताना दिसत आहेत. काहींच्या पोटात आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या  कामगीरीमुळे गोळा येतोय.तो गोळा येळे सहाजीकच आहे.त्यांना एवढ्या कमी दिवसांत एवढा आभ्यास व वस्तुनिष्ठ मांडणी तसेच सर्वसमावेशक प्रश्नावर आमदार साहेबांचा भर तसेच  त्यांना अधिवेशनात बोलण्याची मिळत असलेली संधी या मुळे काहींना झोप लागेनासी झाली आहे. त्यामुळेच कुणाच्या तरी खांद्यावर बंदुक ठेवून निशाणा लावण्याचा केवीलवाना प्रकार काहींच्या माध्यमातुन होत आहे‌‌.आशा प्रश्नाचे राजकारण करीत काही लोक उगीचच संभ्रम निर्माण करीत आहेत.व आमच्यावर आंन्याय वगैरे झाला आहे आशा बातम्या पसरवून संभ्रम निर्माण करीत आहेत.परंतु सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे ती सदैव आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार यात शंका नाही...आमदार बाबासाहेब देशमुख यांची भुमिका ही सर्वांना न्याय देण्याची असल्याने सर्वांना त्यांच्यावर विश्वास आहे असे  भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण