सांगोला शहराचा विकास हाच माझा श्वास असून पुढील पाच वर्षांत शहराचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही - नगराध्यक्ष आनंदा माने.

 सांगोला शहराचा विकास हाच माझा श्वास असून पुढील पाच वर्षांत शहराचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही - नगराध्यक्ष आनंदा माने.



गावाकडच्या बातम्या संपादक कैलास हिप्परकर 98 81 47 27 91



विरोधकांना जोरदार धक्का; शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सांगोल्यात सत्तांतराची नवीन सुरुवात,


सांगोला प्रतिनिधी


 सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेनेने नगराध्यक्ष पदासह १५ नगरसेवक निवडून देत सांगोला शहराच्या राजकारणात निर्णायक वर्चस्व प्रस्थापित केले असून, 'सोन्याचा सांगोला' म्हणून 

ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. सांगोला शहराचा विकास हाच माझा श्वास असून पुढील पाच वर्षांत शहराचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण निर्धार लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. आनंदा यशोदा गोरख माने यांनी व्यक्त केला

शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा माने व १५ विजयी नगरसेवक यांच्या भव्य विजयी मेळाव्याचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक, सांगोला येथे करण्यात आले होते, या मेळाव्यात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती, या मेळाव्याने सांगोला शहराच्या राजकारणात शिवसेनेची ताकद आणि संघटनात्मक एकजूट अधोरेखित झाली.

नगराध्यक्ष आनंदा माने म्हणाले की, सन २०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत सांगोला तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार ड. शहाजी बापू पाटील यांनी खुल्या वर्गाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असतानाही सर्वसामान्य कुटुंबातील सौ. राणीताई माने यांना उमेदवारी देऊन भरघोस मतांनी विजयी केले.


 मात्र, त्या वेळी सत्तेपासून दूर ठेवले गेल्यामुळे शहरातील अनेक विकासकामे रखडली. तरीसुद्धा जनतेशी नाळ जपून काम करण्याची भूमिका कायम ठेवली गेली. यावेळी मात्र संपूर्ण

सत्ताधारी यंत्रणा, राजकीय दबाव व विरोधकांची एकजूट असतानाही सांगोला शहरातील मतदारांनी निर्भीडपणे शिवसेनेच्या बाजूने कौल दिला. ही निवडणूक केवळ नगराध्यक्ष पदापुरती मर्यादित न राहता सांगोला शहराच्या भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी ठरली असल्याचे माने यांनी स्पष्ट केले,

नगराध्यक्ष आनंदा माने पुढे म्हणाले की, ही सत्ता वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी नसून सांगोला शहराच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी आहे, शहरातील रखडलेली विकासकामे, पाणीपुरवठा योजना, ड्रेनेज व्यवस्था, अंतर्गत रस्ते, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता अभियान, व्यापारी व औद्योगिक विकास, युवकांसाठी संधी, तसेच महिला व दुर्बल घटकांसाठी स्वतंत्र योजना राबवण्यात येणार आहेत,

राज्याचे लोकनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सांगोला शहरासाठी भक्कम निधी उपलब्ध करून विकासाची चक्रे वेगाने फिरवली जातील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या विजयी मेळाव्यास सांगोला तालुक्याचे माजी आमदार ड. शहाजी बापू पाटील यांनी उपस्थित राहून नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. शिवसेना तालुकाध्यक्ष रफिक नदाफ यांनी सांगोला शहरात शिवसेनेची सत्ता म्हणजे सामान्य जनतेच्या हक्कांची सत्ता असल्याचे सांगितले. दादासाहेब लवटे, माननीय सागर पाटील, सोमेश यावलकर यांच्यासह सर्व विजयी नगरसेवकांनी शहर विकासासाठी एकसंघपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला,

रफिक नदाफ, प्रा. संजय देशमुख, किरण बनसोडे, नूतन नगरसेवक नितीन इंगोले, तुषार इंगळे यांनी आपल्या मनोगतातून सांगोला शहराच्या राजकीय आणि विकासात्मक वाटचालीत शिवसेनेचा निर्णायक रोल अधोरेखित केला,

सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन आनंद (काका) घोंगडे यांनी केले. या विजयानंतर सांगोला नगरपरिषदेच्या राजकारणात शिवसेनेचे वर्चस्व अधिक मजबूत झाले असून आगामी काळात सांगोला शहराच्या विकासाच्या माध्यमातून शिवसेना आपले नेतृत्व अधिक भक्कम करणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण