सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आ. डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी घेतली मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आ. डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी घेतली मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची भेट.
सांगोला: सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ग्रामविकास मंत्री मा.ना.जयकुमार गोरे व दौंडचे आमदार मा.राहुल कुल देखील उपस्थित होते.
सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली असून यावेळी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मकता दाखवत सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी स्वर्गीय आमदार भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला व सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रलंबित प्रश्न सोडविण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवल्याने आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे आभार मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा