जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चित करण्याच्या शेकाप कार्यकर्त्यांचा निर्धार

 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चित करण्याच्या शेकाप कार्यकर्त्यांचा निर्धार 


गावाकडच्या बातम्या संपादक कैलास हिप्परकर
 मो 98 81 47 27 91


आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त 3 जानेवारी रोजी सांगोल्यात भव्य शेतकरी मेळावा


सांगोला: स्व.आबासाहेबांचा शेकाप पक्ष कधी ही संपणार नाही.शेकापची ताकद काय आहे हे विरोधकांना चांगले माहीत आहे. नगर पालिकेच्या निकालानंतर सध्या विरोधकाकडून सुरू असलेल्या मोठ्या भूलथापाना तालुक्याची सर्वसामान्य जनता कधी ही भीक घालणार नसून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विरोधकांना चारीमुंड्या चीत करण्याचा निर्धार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. बैठकी दरम्यान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त 3 जानेवारी रोजी सांगोल्यात भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्याचे ठरले असून या मेळाव्या मध्ये शेतकऱ्यांना मोफत ( लकी ड्रॉ सोडत) विविध शेती उपयोगी साहित्य देण्याचे निश्चित करण्यात आले.


आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या शेतकरी मेळाव्या संदर्भात काल मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सूतगिरणी सांगोला येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.यावेळी डॉ.अनिकेत देशमुख, डॉ.प्रभाकर माळी, दादाशेठ बाबर, विजय राऊत, विनायक कुलकर्णी, सुरेश माळी, शंकर सरगर, सीताराम सरगर, कल्पनाताई शिंगाडे, इंजि. रमेश जाधव, नीलकंठ लिंगे, संगम धांडोरे , तुकाराम आलदर, बबन जानकर, अवधूत कुमठेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नगरपालिका निवडणुकी पासून विरोधकांनी संभम निर्माण केला आहे तो दूर करणे गरजेचे आहे.नगरपालिकेचा पराभव कार्यकर्त्यांना जिव्हाळा लागला आहे.नगरपालिकेच्या झालेल्या पराभवामुळे शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या असून कार्यकर्ते जिव्हाळ्याने पेटून उठले आहेत. पराभवाची कारणमीमांसा करत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जोरदार पुनरागमन करण्याचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.


पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी एकजूट, संघटनबांधणी आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर देत आगामी निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करत येणाऱ्या निवडणुकीत शेकापच नंबर एक वर असेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे आबासाहेबांचा विचार सांगोला तालुक्यात जिवंत ठेवायचा असेल तर प्रत्येकांनी हेवेदावे बंद करा. पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कोणाही इगो न ठेवता आता जबाबदारीने काम विरोधकांची जागा दाखवून देऊया असे मत अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.


यावेळी चिटणीस दादाशेठ बाबर,विजय राऊत नंदूभाऊ शिंदे, किसन माने, शिवाजीराव व्हनमाने, गजानन बनकर , मारुती ढाळे, गजेंद्र कोळेकर, सुरेश माळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बैठकीस विविध गावांमधून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने आगामी निवडणुकांसाठी पक्ष सज्ज असल्याचे दिसून आले.सूत्रसंचालन व आभार प्रा.एन.डी.बंडगर सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण