जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार - डॉ परेश खंडागळे.
जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविणार - डॉ परेश खंडागळे.
सांगोला तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील असलेल्या गावामधील नागरिकाचा संपर्क व तेथे केलेले आजपर्यंतचे काम त्याच्या जोरावर जिल्हा परिषद निवडणूक लढवणार. तसेच यापूर्वी जवळा पंचायत समिती निवडणूक लढवून चांगल्या प्रकारे मते मिळवली होती व लोकांचा विश्वास प्राप्त केलेला होता.
तसेच जवळा गटातील प्रत्येक गावामध्ये असणारे हितचिंतक नातेवाईक मित्रपरिवार व तेथील जनतेशी असणारा माझा संपर्क या आधारावर ही निवडणूक मी लढवणार आहे
यापूर्वी 2016 रोजी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावर जवळा पंचायत समिती निवडणूक लढवली होती व त्यामध्ये तेथील जनतेने अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला होता.
गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे काम तालुक्यामध्ये पोहोचवणे व भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे केले व लोकसभा असो किंवा या पूर्वीची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी उमेदवाराचे काम ताकतीने केले.
ज्यावेळी सांगोला तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी च्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी तयार नव्हते अशावेळी सर्व ताकतीनिशी पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत दोन्ही निवडणूक लढवल्या. अपयश आले पण पक्षाच्या काम प्रामाणिकपणे केले. व पक्षातील सर्व वरिष्ठ नेते मंडळी यांच्याशी संपर्क ठेवला व पक्षाच्या सर्व कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. पण बऱ्याच वेळा पक्षाकडे पदाची मागणी केल्यानंतर त्याची दखल घेतली गेली नाही तरीही पक्षाशी प्रामाणिक राहिलो व काम चालू ठेवले.
आजपर्यंत केलेले वैद्यकीय क्षेत्रातील काम व मिळालेले विविध पुरस्कार तसेच सामाजिक सेवा व इतर क्षेत्रातील काम या जोरावर ही निवडणूक मी लढवणार आहे
तसेच सांगोला तालुक्यातील सर्व पक्षातील नेतेमंडळी पत्रकार बंधू यांच्याशी असलेला सलोखा त्यामुळे त्यांची मदत मला नक्कीच होईल ही अपेक्षा व्यक्त करतो व त्या विषयावर मी निवडणूक लढवणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा