जवळा जि.प.गटाची निवडणूक मोठ्या ताकतीने लढवणार - डॉ.परेश खंडागळे.

जवळा जि.प.गटाची निवडणूक मोठ्या ताकतीने लढवणार -

 डॉ.परेश खंडागळे,

गावाकडच्या बातम्या ;संपादक कैलास हिप्परकर मो,98 81 47 27 91



सांगोला/प्रतिनिधी :


       मागील पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी भाजप उमेदवार म्हणून जवळा पंचायत समितीची निवडणूक लढवताना जवळा जिल्हा परिषद गटातील विवीध गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदारांशी आलेली जवळीक आजही माझ्या पाठीशी असून अनेक हितचिंतकांनी व मतदारांनी सुचविल्यामुळेच यंदा जवळा जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही मोठ्या ताकतीने लढवणार असल्याची माहिती खंडागळे मल्टीस्पेशालिटीचे सर्वेसर्वा व प्रतिथयश डॉ.परेश खंडागळे यांनी  दिली.


       जवळा जिल्हा परिषद गटातील जनतेशी असलेला दांडगा जनसंपर्क, वैद्यकीय क्षेत्रातील सेवा व भारतीय जनता पार्टीवर असलेली निष्ठा या जोरावर भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते व खंडागळे मल्टीस्पेशालिटीचे सर्वेसर्वा डॉ.परेश खंडागळे यांनी जवळा जि.प.गटातून निवडणूक लढवण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.


भारतीय जनता पार्टीशी कायम पक्षनिष्ठा :


       ज्यावेळी तालुक्यात भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी फारसे कोणी ईच्छुक नव्हते,अशा कठीण काळात भाजपचा झेंडा हाती घेऊन डॉ.परेश खंडागळे यांनी २०१६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या ‘कमळ’ चिन्हावर जवळा पंचायत समितीची निवडणूक मोठ्या ताकतीने लढवली.ग्रामपंचायत असो किंवा पंचायत समितीची निवडणूक असो,त्यांनी नेहमीच भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी भाजप उमेदवारांच्या विजयासाठी सातत्याने परिश्रम घेतले आहेत.


वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक व राजकिय क्षेत्रातही सतत कार्यरत :


     केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हेतर, सामाजिक व राजकिय क्षेत्रातही सतत कार्यरत असल्याने डॉ.परेश खंडागळे हे सर्वपरिचित असे नांव आहे.रुग्णांची सेवा करताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमही राबवले असून त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आजपर्यंत विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. जवळा जि.प.गटातील प्रत्येक गावातील नागरिकांशी असलेला त्यांचा थेट संपर्क व  ‘हक्काचा माणूस’ अशी लोकांमध्ये असलेली त्यांची प्रतिमा त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे.


दुर्लक्षित होऊनही पक्षाशी कायम एकनिष्ठ :


        डॉ.परेश खंडागळे यांनी पक्षाचे काम अनेक वर्षे प्रामाणिकपणे केले, सर्व वरिष्ठ नेत्यांशी समन्वय ठेवला व पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने सहभाग नोंदवला.परंतु,अनेकदा पदाची मागणी करुनही योग्य दखल घेतली गेली नाही,तरीही विचलित न होता,डॉ.परेश खंडागळे हे पक्षाशी कायम एकनिष्ठ राहिले. 


निवडणुकीत सर्वांकडून मदत मिळण्याचा विश्वास :


         जवळा जि.प.गटात डॉ.परेश खंडागळे यांचे मोठ्या प्रमाणावर नातेवाईक,मित्रपरिवार व हितचिंतक असून मतदारांशी अगदी जवळचा संबंध आहे.तसेच तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व पत्रकार बांधवांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांमुळे त्यांना या निवडणुकीत सर्वांकडून मदत मिळणार असून जवळा जि.प. गटातील मतदारांकडून त्यांना आपल्या कामाची पावती नक्कीच मिळेल,असा डॉ.परेश खंडागळे यांना विश्वास आहे.

——————————————————————

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बंडगरवाडी येथिल बंधाऱ्यामध्ये अनोळखी पुरुष जातीचे मयत सापडले

जिल्ह्यातील गट सचिवांना दीपावलीला तीन महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा.

गोरगरीब जनतेसाठी सर्वतोपरी मदतीसाठी धाऊन जाणारा एखतपुर गावचा अवलिया पै.पंकज (Boss) चव्हाण