भारतीय जनता पार्टी मधून प्रशांत वलेकर चोपडी जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार .
भारतीय जनता पार्टी मधून प्रशांत वलेकर चोपडी जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार .
गावाकडच्या बातम्या, संपादक कैलास हिप्परकर मो,98 81 47 27 91चोपडी: आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. चोपडी गटातून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. प्रशांत वलेकर यांनी आपली उमेदवारी जाहीर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाच्या कार्यात सक्रिय असलेल्या वलेकर यांनी जनसंपर्क वाढवला असून, त्यांना जर पक्षाने संधी दिली तर ते या संधीचे सोने करतील, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. "चोपडी गटाचा कायापालट करणे आणि रखडलेले विकासाचे प्रश्न मार्गी लावणे हेच माझे मुख्य ध्येय आहे," असे वलेकर यांनी बोलताना सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे तरुण वर्गात आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
"संपर्क केला आणि रस्ता मिळाला!
जनतेच्या हाकेला ओ देणारे नेतृत्व... चोपडी गटातील वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांच्या कामातून श्री. प्रशांत वलेकर यांनी आपल्या कार्याची पावती दिली आहे. पक्षाने संधी दिल्यास विकासाचा हा वेग अधिक वाढवून चोपडी जिल्हा परिषद गटातील विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन असे प्रशांत वलेकर म्हणाले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा