लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीवर महिलांनी गावात पाणीटंचाईमुळे काढला धडक मोर्चा.
लक्ष्मीनगर ग्रामपंचायतीवर महिलांनी गावात पाणीटंचाईमुळे काढला धडक मोर्चा.
(सांगोला प्रतिनिधी )
दि१५;> गेल्या सात आठ वर्षापासून लक्ष्मी नगर गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे पावसाळा संपतो ना संपतो तोपर्यंतच सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर गावामध्ये पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली असून मागील पंधरा दिवसापासून पाण्याचा थेंब मिळत नाही याबाबत महिलांनी आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला होता. आम्हाला पाणी मिळणार नसेल तर लवकरच हा मोर्चा सांगोला तहसील कार्यालयावर काढण्यात येईल असा इशाराही महिलांनी यावेळी दिला. दरम्यान गावामध्ये ग्रामपंचायतीचे कोणतेही पाण्याचे स्त्रोत उपलब्ध नाहीत. जल जीवन योजनेचे काम केवळ डिजिटल बोर्ड लावण्यापर्यंतच पोहोचले आहे. शिरभावी पाणीपुरवठा योजना देखील बंद आहे. म्हणून सरपंच व पदाधिकारी यांनी महिलांच्या धडक मोर्चा समोर जाण्याचे धाडस केले नाही.
सांगोला तालुक्यातील सुमारे ५ हजार लोकसंख्या असलेल्या लक्ष्मीनगर गावातील पाणीटंचाईचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. तब्बल दीड दोन महिन्यापासून पाणी टंचाई आहे. सध्या ऊसतोडी सुरू असल्यामुळे रात्री दहा अकरा वाजता कामावरून यावा लागतं आणि पहाटे चार-पाच वाजता पुन्हा ऊस तोडी करण्यासाठी जावे लागते अशी परिस्थिती असताना सुद्धा गावची तहान भागवी म्हणून कोणीही गाव पुढाऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी यांनी लक्ष दिले नाही ऊस तोडी करून प्रपंच चालवावा लागतो यामध्येच पहाटेपासून पाण्यासाठी रांगा लावा लागतात. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून ही दखल घेतली जात नसल्याने, यामध्ये गावात ग्रामविकास अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाही. मग आमची तक्रार मांडायची कुणाकडे? म्हणून ग्रामपंचायत आणि तालुकास्तरीय पंचायत समिती कार्यालयाचे लक्ष वेधूनघेण्यासाठी गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत काल रविवारी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला.
गावात ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. सदर विहिरीची खोली अवघी दहा ते पंधरा फूट असून, त्याच्या शेजारी असणाऱ्या शेतकऱ्याने ग्रामपंचायत पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या नजीक म्हणजेच शंभर फुटाच्या आत दुसरी विहीर खोदली आहे. यामुळे ग्रामपंचायतीची विहीर कोरडी आहे. जल जिवन योजनेचे कामासाठी डिजिटल बोर्ड वगैरे लावण्यात आले आहेत. परंतु अद्याप पर्यंत त्यातून पाणी आले नसल्याने नागरिकांची ओरड आहे. बिले काढण्यात आली आहेत परंतु काम केले नाही असा आरोप होत आहे. शिरभावी योजना मागील अनेक महिन्यापासून बंद आहे. गावात शासकीय विभागाकडून कोणतीही पाण्याची योजना सुरू नाही. मागील सात ते आठ वर्षापासून पाण्याची मोठी टंचाई असताना कायमस्वरूपी पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी आज अखेर कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी अथवा ग्रामविकास अधिकारी यांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याने, पाणी टंचाई सुरू आहे. असे ग्रामस्थ सांगतात. तत्पूर्वी दरवर्षीप्रमाणे पावसाळा संपला की लगेच पाणीटंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागतो. यंदा लवकरच पाणी टंचाई सुरू झाली आहे. याबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन येथील नागरिकांना पाणीपुरवठा सुरू करावा. पर्यायी मार्ग निगे पर्यंतच तात्काळ टँकर सुरू करावेत अन्यथा हा मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचा इशारा देखील महिलांनी दिला आहे.
महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढल्यानंतर उपसरपंच धर्मराज ऐवळे यांनी महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु महिलांनी थेट इशारा दिला. दरम्यान सरपंच राणी दिपक बाड उपसरपंच धर्मराज ऐवळे यांनी तात्पुरते स्वरूपात पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू ठेवल्याचे सांगण्यात आले. या मोर्चा दरम्यान सविता साठे, मंगल साठे, लक्ष्मी साठे, क्षमा मुलाणी, वहिदा मुलाणी, शायदा मुलाणी, सुगलाबाई साठे, उषा करांडे, विशाखा कावळे, फाळके मॅडम आदी उपस्थित होते.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा