महुद जिल्हा परिषद गटामध्ये होणार राजकीय भूकंप ! उत्तमदादा खांडेकर निवडणुकीच्या रिंगणात..!
महुद जिल्हा परिषद गटामध्ये होणार राजकीय भूकंप ! उत्तमदादा खांडेकर निवडणुकीच्या रिंगणात..!
सांगोला प्रतिनिधी/ कैलास हिप्परकर
दि,18 जानेवारी;>सांगोला तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषद मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे.महुद गटातून उत्तमदादा खांडेकर यांनी आपली उमेदवारी प्रबळ केली असून,त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
एक शिक्षित, अभ्यासू आणि नेहमी जनसेवेसाठी तत्पर असणारा चेहरा म्हणून उत्तम दादा खांडेकर यांची ओळख आहे. "गावचा विकास, हेच आमचे ध्येय" हा नारा देत त्यांनी गावागावात भेटीगाठी सुरू केल्या आहेत. रस्ते, पाणी, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधांवर त्यांचा विशेष भर राहणार असल्याचे त्यांनी पत्रकाराशी बोलताना म्हणाले.
लोटेवाडी गावचे रहिवाशी ते जनतेच्या मनातील नेता म्हणून त्यांची पूर्ण तालुक्यात ओळख आहे.
सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे,
उत्तम दादां हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. ते २००९ ते २०१४ साली सरपंच पद भूषवलेले महान असे व्यक्तिमत्व आहे.
सर्व घटकातील लोकांना सर्व समसमान न्याय देण्याचे काम हे उत्तम (दादा) खांडेकर यांच्याकडून पहावयास मिळत आहे. त्याची राजकीय कारकीर्दही एकदम संघर्षमय आहे. ते रतन चंद शहा बँक लि. मंगळवेढा या बँकेचे संचालक म्हणून ही काम पाहत आहेत.
स्वतंत्र बाणा जपणाऱ्या, सर्व जाती, धर्माच्या, मित्र परिवारात स्वच्छ, पारदर्शक पाण्यासारखा मिसळून जाणारा, उपेक्षित, वंचित, मागास, गरीब सर्व सामान्यां पासुन इतर मान्यवर महोदयांपर्यत सर्वांविषयी विशेष आस्था, आपुलकी बाळगणारा, सामाजीक, सांस्कृतीक, राजकीय, शेती, क्रीडा इत्यादी विविध क्षेत्रात विशेष रुचि दाखवणारे व्यक्तिमत्त्व म्हणून उत्तमदादा खांडेकर यांचीओळख आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा